नागपूर : देशात आज पैगंबरांच्या जन्मदिनानिमित्त ईद मिलादुन्नबी हा सण साजरा केला जात आहे. या सणानिमित्त महाराष्ट्र युवक काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबीराच आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास ८३ लोकांनी आपलं बहुमूल्य रक्त दान केलं आहे. काँग्रेसच्या या उपक्रमाचं मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात येत आहे.
सध्या देशात कोरोनाचा कहर सुरु असताना काँग्रेसच्या या रक्तदान शिबिरामुळे अनेक रुग्णांना याचा फायदा होणार असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली आहे. कारण सध्या अनेक रुग्णालयात रक्ताचा तुटवडा भासत आहे.
या प्रसंगी प्रमुख उपस्थिती सुरेशजी भोयर महासचिव- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी, मो. इरशाद शेख महासचिव- महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, जुना पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरक्षक देविदास कठाले व जुना पोलिस स्टेशनची टीम,सलामत अली, रिंकू भाई, बंटु भाई ,राशीद अंसारी, शाहिद खान, मोहसिन शेख, सिराज भाटी, मो. सलमान, इरफान अहमद, अफजल खान,अमजद खान (गुड्डू) व नवजवान कमेटी सय्यदानी नगर उपस्थित होते.
रक्तदान शिबीराच आयोजन आयुष ब्लड बैंक च्या डाँ.एस श्रीधर जी व त्यांच्या टीमद्वारे केलं गेलं.
Read Also :
पुलवामा हल्ल्यावर संशय घेणाऱ्या काँग्रेसने आता जाहीर माफी मागायला हवी, प्रकाश जावडेकरांचा घणाघात https://t.co/qlDyRIl8pS@BJP4Maharashtra @PrakashJavdekar @INCMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020