जळगाव : भाजप नेते आशिष शेलार यांना धमकीचा फोन आल्यानंतर आता भाजपमधील आणखी एका नेत्याला खंडणीसाठी धमकीचा फोन आल्याचे समजते ‘एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ,’अशी धमकी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून धमकी देणाऱ्याचा शोध घेण्यात येत आहे.
जामनेरमध्ये जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊन, असं धमकावणाऱ्याने तायडेंना सांगितलं.
खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत एक कोटी रुपये द्या नाही तर बॉम्ब ब्लास्ट करू,अशी धमकी यावेळी देण्यात आली होती, अशी माहिती तायडे यांनी दिली. धमकी देणारा हिंदीत बोलत होता, असंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. याप्रकरणी महाजन यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. तसेच त्यांनी कुणावरही संशय व्यक्त केला नाही. घटनेनंतर घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येक संशयितांची कसून चौकशी केली जात होती.
Read Also
आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा, मग…भाजप नेत्याची मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका https://t.co/9wBD1hBBrE#CMUddhavthackarey #Shivsena @NiteshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 14, 2020