मुंबई : आज कर्नाटक राज्याचा स्थापना दिन असल्याने महाराष्ट्र सरकारमधील सर्व मंत्री आज काळ्या फिती लावून काम करत आहेत. संदर्भात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच एक जीआर काढून आम्ही अशा पद्धतीने कर्नाटक सरकारच्या जुलमी कारभाराचा विरोध करणार असल्याचं घोषित केलं होते.
पण आज बेळगाव आणि कारवार चा प्रश्नाला आम्ही पुन्हा पाटलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं सांगताना राज्यातील जनता सीमाभागातील मराठी भाषिकांच्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया अनेक महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनी दिली आहे.
बेळगावमध्ये काळा दिवस पाळण्यास कर्नाटक पोलिसांनी मनाई केली. बेळगाव इथल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात निषेधाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला. शिवसेना कार्यालयाबाहेर कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला. याच एकंदर परिस्थितीची माहिती एकनाथ शिंदे यांनी तेथील शिवसैनिकांकडून घेतली.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी गेली 62 वर्षे सीमावासियांना लढा सुरु आहे. या लढाच्या पार्श्वभूमीवर आज 1 नोव्हेंबरला मराठी भाषिकांकडून काळा दिवस पाळला जातो. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मंत्री एकनाथ शिंदे यांनी बेळगावातील शिवसैनिकांशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी बेळगावसह सीमाभाग लवकरच महाराष्ट्रात येईल, अशा शब्दात त्यांनी शिवसैनिकांना आश्वस्त केलं.
1 नोव्हेंबर रोजी कर्नाटक सरकारकडून राज्योत्सव साजरा केला जातो. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज काळा दिवस पाळला जातो. मात्र, यावर्षी कर्नाटक सरकारने एकीकरण समितीला कोणतीही परवानगी दिलेली नाही. त्यामुळं कर्नाटक सरकार आणि पोलिसांनी मराठी भाषिकांवर दमदाटी सुरुच असल्याचं पाहायला मिळत आहे.
Read Also :
विधान परिषदेसाठी ठरलेली नाव फक्त पवार-ठाकरेंनाच माहिती : गृहमंत्री अनिल देशमुखhttps://t.co/EjdWCMDmBB @AnilDeshmukhNCP @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) November 1, 2020