मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना आज बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहेत. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या वाटेला कोणता बंगला येणार याची उत्सुकता एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील नेत्यांना लागून राहिली होती. त्यानुसार आज उर्वरित 18 मंत्र्यांना आज बंगल्यांचे वाटप करण्यात आले आहे. उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य असणारे चंद्रकांत पाटील यांना लोहगड बंगला देण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय असणारे सुधीर मुनगंटीवार यांना पुर्णकुटी बंगला देण्यात आला आहे. तर महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्णविखे पाटील यांना रॉयलस्टोन बंगला जाहीर झाला आहे.
खालील मंत्र्यांना जाहीर झालेले बंगले
गिरीश महाजन, सेवासदन
रविंद्र चव्हाण, रायगड
संजय राठोड, शिवनेरी
गुलाबराव पाटील, जेतवन
दिपक केसरकर, रामटेक
मंगलप्रभात लोढा, विजयदुर्ग
शंभूराजे देसाई, पावनगड
अतुल सावे
राहुल नार्वेकर, शिवगिरी
विजयकुमार गावित, चित्रकुट