IMPIMP
Chandrakant Khair has said that no rebel MLA will be elected. Chandrakant Khair has said that no rebel MLA will be elected.

“धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकही बंडखोर आमदार निवडून येणार नाही”

औरंगाबाद : उद्धव ठाकरे यांनी नामांतराचा जो काही मुद्दा घेतला होता. त्याचे श्रेय घेण्यासाठी राज्य सरकारने त्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. शिवसेना फोडण्याचं तुम्ही पाप करीत असून ते त्यांना भरावं लागणार आहे. धर्मवीर आनंद दिघे यांच्यात चित्रपटात दाखवलं आहे की, गद्दारांना क्षमा नाही. मग हे नेमकं काय चाललंय,? असा सवाल औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकनाथ शिंदे यांना केला आहे.

“त्यामुळे मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता”; केसरकरांचं जितेंद्र आव्हाडांना प्रत्युत्तर 

धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकनाथ शिंदे सोडला तर एक ही बंडखोर आमदार निवडून येणार नाही. बाळासाहेबांशी ज्यांनी गद्दारी केली त्यांच्यासोबत असंच होतंय. असं म्हणत एकनाथ शिंदे गावाकडे शेतीच करायला जाणार आहेत. असा इशारा देखील त्यांनी दिला. आम्ही काल नामांतराच्या मुद्दावरून उठाव केल्यानंतर त्यांनी लगेचच कॅबिनेट बैठक बोलवली होती. ते संभाजी महाराजांना घाबरले आहेत. त्यांच्या वडिलाचं नाव देखील संभाजी आहे. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचं अपमान करू नका, असं देखील खैरे म्हणाले.

आमच्या जीवावर येत असेल, तर…; सेनेच्या पदाधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर ठाकरें आक्रमक 

आम्ही देखील ४० वर्ष शिवसेनेत रक्ताचं पाणी केलं आहे. त्यामुळे तुम्ही बाळासाहेबांची शिवसेना फोडायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील जनता कधीही माफ करणार नाही.  अब्दुल सत्तार म्हटले की एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यसमोर कुणाचाच बाण टिकणार नाही. यावर बोलताना म्हणाले की, हा धनुष्य फक्त बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा असून त्यांनी शिवसेनेची घटना वाचावी, असाही सल्ला खैरे यांनी दिला आहे.

“अन्यथा..! या सरकारची दे माय, धरणी ठाय अशी अवस्था करू” 

दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून शिवसेना आणि एकनाथ  शिंदे गटात राजकीय संघर्ष सुरू आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे सेनेतून अनेक जणांची हाकालपट्टी करण्यात आली आहे तर अनेक नगरसेवक, पदाधिकारी, आणि सेनेचे कार्यकर्ते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होत आहेत.

Read also