राज्यातील शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्षपूर्ण झाले आहे. यानिमित्ताने शिवसेना नेते आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यात मुख्यमंत्र्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर भाजपनेही शिवसेनेवर पलटवार केला.
कोल्हापूरमध्ये पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर देखील निशाणा साधला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच वेगवेगळी विधाने करुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात. पण, मुख्यमंत्र्यांना राऊतच जास्त प्रिय आहे’ , असा टोला चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आणि संजय राऊत यांना लगावला.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, ‘जो समर्थ माणूस असतो, त्याला शत्रू जास्त असतात. भारतीय जनता पार्टी एकटी सर्वांना पुरून उरली आहे, त्यामुळे त्याचा थयथयाट अपेक्षित आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत हेच वेगवेगळी विधाने करुन मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणतात. पण, मुख्यमंत्र्यांना राऊतच जास्त प्रिय आहे’ , असा टोलाही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
Read Also :
‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी उद्धव ठाकरेंची अवस्था, नारायण राणेंची टीका
राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक, शरद पवारांनी घेतली भेट
चंद्रकांत पाटलांनी कोल्हापुरातून निवडणूक लढवली तर त्यांचं डिपॉझिट जप्त होईल : मंत्री हसन मुश्रीफ