पुणे : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या मतदार नोंदणीसाठी भाजपचे सुनील माने यांच्यातर्फे आज ‘ मतदार नोंदणी आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला. यासाठी तयार करण्यात आलेल्या व्हॅनचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते पक्ष कार्यालयात करण्यात आले.
चंद्रकांत दादा म्हणाले, कोरोनामुळे पदवीधर मतदारांना प्रत्यक्ष मतदार यादीत नाव नोंदणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाने डिजिटल पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तरीही पदवीधर मतदार नोंदणीस म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. अशा परिस्थितीत सुनील माने यांनी सर्वसामान्यांच्या सोयीसाठी फिरती व्हॅन तयार केली आहे. घरोघरी जाऊन मतदार नोंदणी अभियान राबवल्याने मतदार नोंदणीसाठी चांगला प्रतिसाद मिळेल.
खासदार बापट म्हणाले की, पदवीधर मतदार नोंदणी मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने जास्तीत जास्त मतदार नोंदणी कशी होईल याचा विचार करून सुनील माने यांनी हे अभियान सुरु केले आहे. यामुळे जनजागृती होऊन अधिक मतदारांची नोंद होईल. दरम्यान शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनीही आपल्या मनोगतातून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. पुणे पदवीधर मतदार संघाची जागा तिसऱ्यांदा मिळवण्यासाठी हा उपक्रम नक्कीच उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी पश्चिम महाराष्ट्राचे संघटनमंत्री रवीजी अनासपुरे, पुण्याचे प्रभारी गणेशजी बीडकर, स्थायी समितीचे अध्यक्ष मा. श्री. हेमंतजी रासने, पक्षाचे शहर संघटन सरचिटणीस मा. राजेशजी पांडे, सरचिटणीस गणेशजी घोष, दत्ताभाऊ खाडे, दीपकजी नागपुरे, राजेशजी येनपुरे, दीपकजी पोटे, भाजयुमोचे शहराध्यक्ष मा. राघवेंद्र (बापू) मानकर, महिला शहराध्यक्षा मा. अर्चनाजी पाटील, शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष मा. प्रसन्नदादा जगताप, नगरसेवक अमोलजी बालवडकर आणि उमेशजी गायकवाड, उपाध्यक्ष गणेशजी कळमकर, प्रा. श्रीपाद ढेकणे, योगेशजी बाचल, शिवाजीनगर मतदारसंघाचे अध्यक्ष रवींद्रजी साळेगावकर, कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष पुनीतजी जोशी, भाजयुमोचे सरचिटणीस प्रतिक देसरडा आदी उपस्थित होते.
Read Also :
उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा ; हाथरस प्रकरणावरून शिवसेना आक्रमक https://t.co/m9rl1xFLQe #HathrasCase
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 4, 2020