मुंबई मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?, असा संतप्त सवाल राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपला विचारला आहे
राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेले तेव्हा त्यांनाही रोखण्यात आले. आरोपींच्या बाजूने भाजपचे लोक एकत्र आले आहेत. मुलींना संस्कारित करा, असे भाजपचे आमदार म्हणतात. मुलगी सुशिक्षित असो की अशिक्षित, तुम्ही बलात्कारच करणार का?, असा संतप्त सवाल त्यांनी भाजपला विचारला. तसेच वाल्मिकी समाजाची मुलगी असू दे किंवा ठाकूर अथवा ब्राह्मण असू दे. ती आपल्या मुलीसारखी आहे. मागासवर्गीय समाजाचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजावर असल्याचेही यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी,काही महिन्यांनंतर तुम्ही सगळे मरा, मी राहतो घरीhttps://t.co/ji2knzDAYh#MahavikasAaghadi #majhekutumbmajhijababdari @NiteshNRane
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020