मुंबई :शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने लासलगांव रेल्वे स्थानकात किसान रेल्वेला थांबा देण्यात यावा, अशी मागणी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे.
भुजबळ यांनी रेल्वे मंत्री गोयल यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या वतीने देवळाली ते दानापूर पर्यंत देशातील पहिली किसान रेल्वे सुरू केली आहे. या माध्यमातून नाशवंत भाजीपाला व नाशिक जिल्ह्यातील फळांची उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये जलद वाहतूक करण्यात येऊन चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने हा किसान रेल्वे उपक्रम कौतुकास्पद आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या उपक्रमामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
केंद्र शासनाच्या वतीने नुकतीच देवळाली ते दानापूर ही देशातील पहिली किसान रेल्वे सुरू करण्यात आली आहे. या किसान रेल्वेला आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगांव रेल्वे स्थानकात मात्र थांबा देण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे भुजबळ यांनी सांगितले .
Read Also :
https://twitter.com/PoliticalMH/status/1303314440327016450?s=20