IMPIMP
Chhagan Bhujbal's attack on the Chief Minister Chhagan Bhujbal's attack on the Chief Minister

“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी

नाशिक :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे ते भिवंडी या महामार्गावर येऊन खड्डे बघावेत. तसेच या महामार्गावरून प्रवास करून दाखवावा असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आणी माजी मंत्री छगन भुजबळ यांनी केले. याचसोबत  काय तो पाऊस, काय तो पूर, काय खड्डे सगळं ओके आहे, असं म्हणत त्यांनी शाब्दिक टोलेबाजी देखील एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.   छगन भुजबळ लासलगाव येथे निफाड तालुक्यातील सोसायटीच्या नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार कार्याक्रमात बोलत होते.

” निवडणुकीत घोडेबाजार हा उद्देश आघाडीचा होता, आमचा नाही” 

यासोबतच छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे पालकमंत्री राहिले असून त्याच्याकडे सध्या सर्वच खाती आहेत.  त्यामुळे त्यांनी ठाणे ते भिवंडी या मार्गावर येऊन प्रवास करावा या ठिकाणच्या रस्त्यात खुप खड्डे पडले आहेत . सरपंच थेट जनतेतून निवड करण्याच्या शिंदे सरकारच्या निर्णयावर, सरपंच जनतेतून पाहिजे तर मग मुख्यमंत्री फुटलेल्या आमदारातून का असा सवाल देखील  छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सवाल केला आहे.

“राज्यात कृषीमंत्री नसले तर आम्ही इथे आहोत, मंत्रीमंडळाचा विस्तार नंतर करा” 

नगरपरीषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतुन निवडा असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे. मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही,  तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत, थेट नगराध्यक्ष निवडीत पैशाची खेळी करता येत नाही, हे लक्षात आल्याने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने तो निर्णय रद्द ठरविला होता, अशी प्रतिक्रिया राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक निर्णयांना मंजूरी देण्यात आली.

“हिंदुत्वासाठी भाजपसोबत गेलेत ना, मग तुम्हाला मंत्रिपद कशासाठी हवंय?”

सारथी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, होस्टेल असे अनेक निर्णय आपण घेतले, पण या सर्व निर्णयांचे महविकास आघाडीने वाटोळे केले. आपण मतांसाठी नाही, तर समाजाच्या हितासाठी काम केले पाहिजे. तेच आपल्या कामाचे ब्रीद होते आणि यापुढेही राहील. मराठा आरक्षणाचा आम्ही कायदा केला, तामिळनाडूनंतर उच्च न्यायालयात टिकलेला आपला कायदा होता. यानंतर सर्वोच्च न्यायालयात सुद्धा प्रकरण गेले, तेव्हा कधीही स्थगिती आली नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात काय झाले, ते सर्वांनाच माहिती आहे. पुढचा मार्ग खडतर आहे,पण आपल्याला पुढे जावेच लागेल. असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Read also