IMPIMP
Chhagan Bhujbal's U-turn, said Chhagan Bhujbal's U-turn, said

छगन भुजबळांचा यू-टर्न, म्हणाले, “एवढा काही मी मुर्ख नाही की…,”

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल अजून लागला नाही, परंतु विधानसभा निवडणुकीची चर्चा राज्यात सुरू झाली आहे. अशातच अजित पवार गटातील मंत्री छगन भुजबळ यांनी महायुतीत आम्हाला ८० ते ९० जागा मिळायला हव्यात. तसा भाजपने शब्द देखील दिल्याचे भुजबळांनी म्हटलंय. त्यानंतर भाजपच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत भुजबळांनी यु टर्न घेतल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

लोकसभा निवडणुकीत जो गोंधळ झाला होता. तो विधानसभा निवडणुकीच्या बाबती होता कामा नये. यासाठी आताच भाजपला त्यांनी ८० ते ९० जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या. महायुतीमध्ये येताना भाजपने दिलेल्या शब्दाप्रमाणे विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा. असं भुजबळांनी म्हटलं होतं.

त्यावर विधानसभेमध्ये कोणी किती जागा लढायच्या यासंदर्भात तिन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसतील. योग्य तो फॉर्म्युला ठरवतील आणि त्यानुसार तिन्ही पक्षांना योग्य जागा मिळतील. भाजप सर्वात मोठा पक्ष असल्याने निश्चितपणे आम्हाला सर्वात जास्त जागा मिळतील. पण आमच्यासोबत जे दोन पक्ष आहेत. त्यांचा पुर्ण सन्मान राखला जाईल. अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय.

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी 

देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर भुजबळांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यावर ते म्हणाले की, मी केवळ चर्चेची आठवण करून दिली की, याबाबतीत आता सतर्क रहा आणि ऐनवेळी वादविवाद होणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही आम्हाला जे सांगितलं आहे. त्याप्रमामे घडवून आणा. आम्हाला जे सांगितले तेच मी पक्षाच्या बैठकीमध्ये बोललो. असे भुजबळांनी म्हटलं.

तसेच याबाबत कुठेही बाहेर बोललेलो नाही. भाजप हा आमच्या महायुतीमध्ये मोठा भाऊ आहे. त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार. एवढा काही मी मुर्ख नाही की त्यांना कमी आणि आम्हाला जास्त जागा द्या असे सांगायला असेही भुजबळांनी सांगितलं.

READ ALSO :

हेही वाचा…“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

हेही वाचा…विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ? 

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू 

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक