मुंबई : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी खासदार उदयनराजे आणि खासदार संभाजीराजे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावरून संभाजी भिडे गुरूजी यांच्यावर निशाणा साधला आहे. या आधी छत्रपतींचा अपमान झाला म्हणून भिडे यांनी आंदोलन छेडले होते. आता छत्रपतींचा अपमान होत असताना भिडे यांनी बोललं पाहिजे असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबईत बसून काही लोक मुंबई, सरकार, उद्धव ठाकरे, शरद पवार, अनिल देशमुख आणि माझ्यावर गरळ ओकत आहेत. त्यांचा बोलावता धनी कोण आहे हे तपासात कळेलच. मुंबई पोलिसांच्या या कारवाईचं कौतुक होत आहे. या कारवाईबाबत कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्याचा उपचार आम्ही करू. यातून अनेक गोष्टी बाहेर या येतीलच.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी MPSC ची परीक्षा घेऊनये अशी भूमिका मांडली होती. परीक्षा घेण्याचा निर्णय झाला तर त्याचे गंभीर परिणाम होतील असा इशारा दिला होता. त्यावरून प्रकाश आंबेडकरांनी जोरदार टीका केली होती. त्यावरून राऊक यांनी भिडे यांना कात्रित पकडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं हे योग्य नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.
दरम्यान या प्रकरणावर संभाजीराजे यांनीही भूमिका मांडली आहे. गेल्या सरकारच्या काळापासून मी याच गोष्टी बोलत असल्याचे संभाजीराजे यांनी स्पष्ट केले. आता मराठा समाजाने सर्व गोष्टींचा अभ्यास करायला शिकले पाहिजे. मागच्या आणि आताच्या सरकारने मराठा समाजाला जाहीर केलेल्या गोष्टी प्रत्यक्षात दिल्या का? नुसते आकडे नको, सरकारने प्रत्यक्षात मदत दिली पाहिजे, असे संभाजीराजे यांनी सांगितले.
तत्पूर्वी सोलापुरातील आजच्या मराठा ठोक क्रांती मोर्चाला लोकांनी मोठ्याप्रमाणावर गर्दी केली होती. या आंदोलकांकडून उदयनराजे भोसले आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यावर टीका करणाऱ्या प्रकाश आंबेडकर यांच्याविरोधा घोषणाबाजी करण्यात आली.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. दरम्यान, छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या भाषणादरम्यान आंदोलकांना कोणतीही जाळपोळ किंवा नासधूस न करण्याचे आवाहनही केले.
Read Also :
नुसतं बोलण्यापेक्षा आरक्षण द्या, नंतर काय ते राजकारण करत बसा- संभाजीराजेhttps://t.co/Mf1zlcYJi3
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 9, 2020