सोलापूर : गेल्या काही दिवसापासून माढा लोकसभा मतदासंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. अशातच आता फलटणचे राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळर यांचे बंधू रघूनाथराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर जोरदार प्रहार केलाय. मला तो उमेदवार मान्य नाही, म्हणून माझा भाजप उमेदवाराला विरोध आहे. दुसरी बाब ही शरद पवारांचा मी चाहता असून त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्यासोबत असले पाहिजे. असेही रघूनाथ निंबाळकर यांनी म्हटले आहे.
हेही वाचा..“बारामतीच्या सूनबाईंना खासदार म्हणून दिल्लीत पाठवा”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं आवाहन
रघुनाथराजे निंबाळकर म्हणाले की, मला घड्याळ्यापेक्षा तुतारी जास्त आवडली. घड्याळ १० वाजून १० मिनिटांनी थांबलं. मात्र तुतारी तु तू करत वाजली की अख्खा महाराष्ट्र गरजतो. तुतारी मला छान वाटली. पक्ष गेलं, चिन्ह गेलं परंतु दोन तासात तुतारी तळागाळात गेली. ठाकरेंना मशाल दिली. निवडणूक आयोगाने हे चांगलं काम केलं. राज्यात मशीन हॅक झाल्या नाहीत. तर नक्कीच महाविकास आघाडीला चांगलं वातावरण आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार, अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी”,- मुरलीधर मोहोळ
दरम्यान, ५० ते ६० अधिकाऱ्यांना हाताशी धरून प्रत्येक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करणे सुरू आहे. नीरा देवधर धरण रामराजेंनी बांधून ६० ते ७० किमी पाणी आणलं. सध्याच्या खासदार स्वत: ला पाणीदार खासदार म्हणतो. हे क्रेडिट खाण्याचा प्रयत्न आहे. मंत्रालाय माझ्या आजोबांनी बांधले, कोयना धरण माझ्या आजोबांनी बांधले, कोणी नाव तरी घेतं का ? अशी खंत देखील निंबाळकरांनी व्यक्त केली. तर आता रामराजे यांच्याबाबत देखील हेच घडत आहे. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“शहरी पूर नियंत्रण आराखडा राबविणार”, मुरलीधर मोहोळांनी पुणेकरांना दिलं आश्वासन
हेही वाचा…“तर त्यांची ऐशी की तैशी करुन टाकली असती”, तटकरेंनी दिला सुचक इशारा
हेही वाचा…“माझ्यावर टिका केल्याशिवाय मोदींना झोप येत नाही”, शरद पवारांचा मोदींना खोचक टोला
हेही वाचा…अखिल भारतीय मराठा महासंघाचा मुरलीधर मोहोळ यांना पाठींबा