IMPIMP
eknath shinde eknath shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजनांचा पाऊस पाडला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनांची घोषणा करण्यात आली. यातच आता सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनांची घोषणा केली आहे. त्यामुळे सध्या या योजनेची सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधीद्वारे तिर्थदर्शन लक्षवेधी केली. त्यानंतर याची स्पष्ट माहिती देत पांडुरंगाची वारी सुरू आहे. आपण पहिल्यांदाच २० हजार रूपये दिंडीला अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता राज्यात मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनाबाबत नियम ठरवू असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी याबाबत सभागृहात अधिक माहिती दिली.

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

प्रताप सरनाईक यांनी मांडलेल्या लक्षवेधीनुसार जे ज्येष्ठ नागरिक दर्शन घेण्यासाठी तीर्थक्षेत्रांना जाऊ इच्छितात. त्यांना तीर्थ यात्रा परवडणारी नाही. त्यांना याचा लाभ घेता यावा यासाठी मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ योजना सुरू करावी अशी मागणी केली होती. त्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री देवदर्शन तीर्थ योजना आम्ही आजपासून सुरू करत आहोत. यासाठी एक धोरण ठरवलं जाणार आहे. शासनाच्या माध्यमातून ५ हजार ते १० हजार लोकांना तीर्थ दर्शन यात्रा घडवली जाईल. असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, या योजनेत सर्व धर्मीय हिंदू, ईसाई, शीख, बौद्ध, जैन, ख्रिश्चन यांच्या धार्मिक स्थळांचा समावेश असेल. तर हज यात्रा तर आधीपासून असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

READ ALSO :

हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं 

हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल 

हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

Leave a Reply