मुंबई – २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी जोरदार राजकीय हालचाली झाल्या आणि शिवसेनेने भाजपशी युती तोडत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत महाआघाडी स्थापन केली. या महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. या सर्व घडामोडीनंतर भाजप विरुद्ध शिवसेना हा वाद सतत पाह्यला मिळत आहे त्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सतत एकमेकांवर कुरघोडी करत असतात. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चक्क देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं
मेट्रोच्या मेड इन इंडिया कोचचं मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन काल करण्यात आलं. या कार्यक्रमात मुख्यमंत्री ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कामाची स्तुती केली. यापूर्वीच्या सरकारनेची चांगली कामं केली असं त्यांनी म्हटले आहे. भाषणात त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत चांगलं काम केल्याचं म्हटले.
येत्या दोन चार वर्षांत मुंबई बदलणार आहे. मुंबईचे रुपडे पालटणार आहे. मागच्या सरकारने ज्या वेगाने काम केलं त्या पेक्षा अधिक वेगाने काम करत नागरिकांच्या सेवेस उतरू, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दहीसर ते डीएन नगर ही मेट्रो 2 अ आणि दहीसर ते अंधेरी ही मेट्रो 7 दाखल होणार आहे. या मेट्रोच्या कोचेसचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चारकोच्या कारशेडमध्ये अनावरण करण्यात आले