IMPIMP
Close the door of Bhujbal who is unhappy with NCP in Shiv Sena, a big decision was taken in the meeting Close the door of Bhujbal who is unhappy with NCP in Shiv Sena, a big decision was taken in the meeting

राष्ट्रवादीत नाराज असलेल्या भुजबळांचे शिवसेनेतील दार बंद करा, बैठकीत झाला मोठा निर्णय

नाशिक : लोकसभा तसेच राज्यसभा निवडणुकीत डावलले गेलेले अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात शिवसेनेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. उमेदवार न दिल्याने छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यानंतर छगन भुजबळ लवकरच शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. यातच आता शिवसेनेतील छगन भुजबळांचे दारे बंद करा अशी मागणी आता वाढू लागलीय.

हेही वाचा…लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ दाखल, सरकारने घेतला हा निर्णय

गेल्या अनेक दिवसापासून छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या बातम्या समोर येऊ लागल्या आहेत. यातच छगन भुजबळ लवकरच ठाकरे गटात प्रवेश करणार असं समजत आहे. याच पार्श्वभूमीवर निफाड तालुक्यातील ४६ गावातील पदाधिकाऱ्यांनी लासलगाव येथे बैठक बोलवली होती. या बैठकीत कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत छगन भुजबळ यांना आपल्या पक्षात प्रवेश देऊ नका. अशी मागणी केली. त्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

हेही वाचा..“ज्याचा मी प्रचार केला असता तो ४८ मतांनी नाही तर..”, गजानन किर्तीकर यांचं मोठं विधान 

दरम्यान, छगन भुजबळ सध्या ठाकरे गटात येणार अशा चर्चांमुळे कार्यकर्त्यांचे मला फोन येऊ लागले. त्याच पार्श्वभूमीवर भुजबळांना रोखण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली. या बैठकीत भुजबळांना आपल्या पक्षात घेतल्यास त्याचे वाईट परिणाम होतील. भुजबळ यांच्यामुळे आपल्या जवळ आलेले अनेक लोक दुर जातील. भुजबळांमुळेच मराठा ओबीसी वाद मतदारसंघात निर्माण झालाय. असं माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..खडसेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट, भाजपमध्ये खडसेंना मोठी जबाबदारी ? 

हेही वाचा..हाकेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ वडीगोद्री गावात, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया… म्हणाले… 

हेही वाचा..“कुणबी नोंदणी प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम थांबवा,” हाकेंच्या मागणीला आता पंकजा मुंडेंचाही पाठिंबा

हेही वाचा…हाकेंचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार , मुंबईत आज सायंकाळी मोठी खलबतं 

हेही वाचा…बच्चू कडूंच्या जीवाला अज्ञातांकडून धोका, पोलिसांना लिहिलं ‘हे’ पत्र 

Leave a Reply