शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली या मुलाखतीचा पहिला प्रोमो काल रिलीज करण्यात आला होता. यामध्ये मुख्यमंत्री कोरोना व्हायरस, अंतिम वर्षाच्या परीक्षा या विषयांवर बोलताना दिसत आहे. आज या मुलाखतीचा दुसरा प्रोमो रिलीज करण्यात आलेला आहे.
या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या प्रश्नांना रोखठोक उत्तर देताना दिसत आहेत. राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मी अजिबात निराशावादी नसून, दुसऱ्यांनाही होऊ देणार नाही, असे स्पष्टपणे सांगत आहेत. याशिवाय राज्यातील गुंतवणूक, त्यासंबंधी धोरणे, राष्ट्रभक्ती याविषयी देखील या प्रोमोमध्ये उद्धव ठाकरे बोलताना दिसत आहेत.
महाविकास आघाडी काय म्हणतेय ? असा प्रश्न देखील संजय राऊत मुख्यमंत्र्यांना विचारतात. पंरतु, मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या प्रश्नाचे उत्तर संपुर्ण मुलाखत आल्यावरच पाहण्यास मिळेल. ही मुलाखत दोन भागांमध्ये 25, 26 जुलैला दैनिक सामनावर प्रसिद्ध होणार आहे.