नवी मुंबई : मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. तर चरणसिंह सप्रा यांची कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding appointment of President, Working President, Chairmen and members of various committees of Mumbai Regional Congress Committee pic.twitter.com/e6e1SwFZQq
— INC Sandesh (@INCSandesh) December 19, 2020
काँगेसचे महासचिव के सी वेणुगोपाल यांनी काढलेल्या पत्रकात जगताप हे मुंबईचे अध्यक्ष, तर चरणसिंग सप्रा हे कार्याध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले आहे. समन्वय समितीचे अध्यक्ष म्हणून अमरजितसिंग आर मनहास यांना नियुक्त करण्यात आले आहे. अजेंडा आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसकडून भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाई जगताप सध्या काँग्रेसकडून विधान परिषदेवर आमदार आहेत.