काँग्रेस नेतृत्व आणि पक्षसंघटनेच्या पुनर्रचनेची मागणी करणाऱ्या २३ ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या पत्राची दखल घेत कार्यसमितीच्या बहुतांश सदस्यांनी या नेत्यांवर तीव्र टीका केली. काँग्रेस कार्यसमितीची सोमवारची बैठक वादळी ठरली. मात्र, हंगामी पक्षाध्यक्षपदी सोनिया गांधीच कायम राहतील, असा निर्णय सात तासांच्या वादळी चच्रेनंतर घेण्यात आला.
कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आज पुन्हा एकदा ट्विट केल्यानं चर्चांना उधाण आलं आहे. “हा कोणत्याही पदाचा प्रश्न नाही. हा माझ्या देशाचा प्रश्न आहे जो सर्वाधिक महत्त्वाचा आहे,” असं सिब्बल म्हणाले. दरम्यान, सिब्बल यांच्या ट्विटर हँडलवरूनही अनेक शंका व्यक्त करण्यात येत आहेत. सोमवारी पार पडलेल्या कार्यसमितीच्या बैठकीनंतर सिब्बल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून काँग्रेस हे नाव हटवलं आहे.
It’s not about a post
It’s about my country which matters most— Kapil Sibal (@KapilSibal) August 25, 2020
नेतृत्व निवडीच्या बैठीमध्ये राहुल गांधी यांनीअनेक नेत्यांना फटकारलं व भाजपासोबत संगनमत केल्याचा आरोप केला.त्यामुळॆ बैठकीनंतर अनेक मोठे नेते राहुल गांधींवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. कपिल सिब्बल यांनी ट्विट करत राहुल गांधींवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली होती. मात्र लगेचच त्यांनी ते ट्विट डिलीट करत पुन्हा दुसरे ट्विट केले.