IMPIMP
Congress got the most 13 seats, the banner of Patole as the future Chief Minister was raised in Nagpur Congress got the most 13 seats, the banner of Patole as the future Chief Minister was raised in Nagpur

कॉंग्रेसला मिळाल्या सर्वाधिक १३ जागा, नागपुरात लागले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

मुंबई : महाराष्ट्रातील लोकसभेचे मैदान जिंकताना महाविकास आघाडीने ४८ पैकी ३० जागा मिळवत दमदार यश संपादित केले आहे. महायुतीला फक्त १७ जांगावर समाधान मानावं लागणार आहे. कॉंग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. तर उद्धव ठाकरे आणि भाजपला प्रत्येकी ९ जागा मिळाल्या आहेत. शरद पवार गटाला ८, शिवसेना शिंदे गटाला ७ तर अजित पवार गटाला १ जागा मिळाली आहे. यातच आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस असून त्यांचे आता भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर 

लोकसभा निवडणुकीच्या यशानंतर कॉंग्रेसला राज्यात मोठं बळ मिळालं आहे. यातच आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आज वाढदिवस आहे. यातच वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी करण्यात आलीय. त्यावर नाना पटोले यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला आहे. नागपुर येथील वंजारीनगर भागात हे बॅनर लोकांचं लक्ष केंद्रीत केले जात आहे.

हेही वाचा…इंडिया आघाडीला देशात २९५ जागा मिळणार, खर्गेंनी केला मोठा दावा 

गेल्यावेळी ४१ जागा जिंकणाऱ्या महायुतीमध्ये फुटलेली शिवसेना आणि फुटलेली राष्ट्रवादी सहभागी झाली. पण गेल्यावेळपेक्षा निम्म्याहून चार जागा यावेळी कमीच मिळाल्या आहेत.  त्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्या बाजूला शरद पवार, अजित पवार आणि कॉंग्रेसने मोठी लढत दिली.

दरम्यान, यातच पुढच्या काही महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे आता राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. लोकसभेच्या निकालानंतर राज्यात आता कॉंग्रेस मजबुत स्थितीमध्ये पोहचली आहे. त्यामुळे आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला किती जागा मिळणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..तर नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत

हेही वाचा..“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण 

हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट 

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार 

हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला सर्वात जास्त जागा, अजित पवार गटाला भोपळा ? एक्झिट पोल समोर