देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे सांगत सरकारने अनेक चिनी अँपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारने काही दिवसांपूर्वी चीनला मोठा दणका दिला. लोकप्रिय अॅप टिकटॉकसह 59 चीनी अॅप्सवर मोदी सरकारने बंदी घातली आहे. मात्र त्यानंतर आता भाजपाकडून या बंदी घालण्यात आलेल्या अॅपचा वापर होत असल्याचं ट्विट काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.
भाजपाच्या बेगडी राष्ट्रप्रेमाचा फुगा फुटला असून भाजपा गद्दार असल्याची घणाघाती टीका सचिन सावंत यांनी केली आहे. गद्दार महाराष्ट्र भाजप मोदी सरकारने बंदी घातलेल्या कॅमस्कॅनर अॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे.ही बाब सावंत यांनी ट्विटच्या माध्यमातून जनतेसमोर आणली आणि चीनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे असे म्हणत भाजपवर जोरदार टीका केली आहे.
महाराष्ट्र भाजपाने जारी केलेलं एक प्रसिद्ध पत्रक सावंत यांनी ट्विट केलं असून हे पत्रक बंदी घालण्यात आलेल्या अॅपच्या यादीत असणाऱ्या कॅमस्कॅनने स्कॅन केलेलं आहे. भाजपाने प्रसारमाध्यांसाठी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यसमितीसाठी करण्यात आलेल्या नियुक्ती संदर्भातील यादी जारी केली. या यादीच्या खाली कॅमस्कॅनचा लोगो दिसत आहे.
जाहीर निषेध! गद्दार @BJP4Maharashtra मोदी सरकारने बंदी घातलेले #कॅमस्कॅनर अॅपचा अजूनही राजरोसपणे वापर करत आहे. चीनी अॅपवर बंदी आणि आत्मनिर्भर अभियान ही सर्व धूळफेक आहे. भाजपाचे चीनबद्दलचे प्रेम ओसंडून वाहणारे आहे हे स्पष्ट आहे. pic.twitter.com/9w0g5L0Im5
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) August 25, 2020
हे देखील वाचा
काँग्रेस आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊत म्हणतात . .https://t.co/NswTsaInxL
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) August 25, 2020