IMPIMP
Congress's Sandeep Gulve Thackeray will change the picture of the Vidhan Parishad elections in Nashak Congress's Sandeep Gulve Thackeray will change the picture of the Vidhan Parishad elections in Nashak

कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज विक्री आणि स्विकृतीस सुरूवात झालीय. पहिल्याद दिवशी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीसाठी भाजपचे नेते विवेक कोल्हे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर विद्यामान आमदार किशोर दराडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून महायुतीमार्फत पाठिंबा मिळवण्यसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे.  तर दुसऱ्या बाजूला ठाकरे गटाकडून देखील मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा…दानवेंच्या कार्यकर्त्यांनी कुंभार कुटुंबावर हल्ला केल्याचा आरोप :जमिनीसाठी घर पाडले, संसार उघड्यावर; वडेट्टीवार पीडितांच्या भेटीला 

यातच विधान परिषदेच्या निवडणुकीकरीता नाशकात मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. नाशिकमधील कॉंग्रेसचे नेते संदीप गुळवे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत.  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दुपारी 2 वाजता शिवसेनाभवन दादर येथे नाशिकचे अॅड संदीप गुळवे यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश होणार आहे. त्यामुळे नाशकातील राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

हेही वाचा..मोठी बातमी…! मनोज जरांगेंच्या अटक वॉरंट प्रकरणात पुणे कोर्टाचा मोठा निर्णय 

संदीप गुळवे हे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गोपाळराव गुळवे यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. संदीप गुळवे हे विधान परिषद निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. त्यामुळे नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीचं चित्र बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ? 

हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले… 

हेही वाचा…शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर 

हेही वाचा…“०४ जून च्या नंतर अजित दादांची नौका बुडणार”, शरद पवार गटाचा खोचक टोला 

हेही वाचा..“भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते”, अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली