वाशिम: जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी समितीची सभा होण्यापूर्वी शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप जिल्हाध्यक्ष व आमदार राजेंद्र पाटणी या दोघांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. यानंतर वाशिममध्ये काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. राजेंद्र पाटणी यांनी भावना गवळींविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेमुळे वाशिममध्ये तणाव निर्माण झाला होता.
शिवसेना खासदार भावना गवळी आणि भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये झालेल्या वादामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दोघांमध्ये झालेल्या वाद पोलीस कर्मचारी व इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यानं मिटला. मात्र, या घटनेची जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.
खासदार भावना गवळी आणि आमदार पाटणी यांच्यात शाब्दीक बाचाबाची झाल्याने वाशीम शहरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. शहरातील बाजरपेठ बंद करण्याच आवाहन कार्यकर्ते दुचाकी वाहनांवरुन फिरुन करत असल्याचं दिसून आलं.
आम्ही नियोजन मंडळ्याच्या सभागृहात प्रवेश केल्यावर खासदार भावना गवळींनी बोलावून घेतले. त्यानंतर त्यांचा तोल सुटला, त्या असभ्य भाषेत माझ्याशी बोलल्या. त्यांच्यासोबत पन्नास लोकं होते. खासदारांचं संतुलन का गेले समजलं नाही. लोकप्रतिनिधींनी मतभेद असले तरी बोलायलची पद्धत असते. त्यांच म्हणनं आम्ही ऐकून घेतलं वाद घातला नाही. आज घडलेला प्रकार पोलीस स्टेशनमध्ये सांगितला, असल्याचं भाजप आमदार राजेंद्र पाटणी म्हणाले.
Read Also
न दिसणाऱ्या शत्रू संगे आमचे युद्ध सुरु – मुख्यमंत्री
शेतकरी आंदोलन चिघळले! कार्यालयाजवळ एका आंदोलकाचा मृत्यू, संतापाचे वातावरण