IMPIMP

पवार कुटंबातील सुप्त संघर्ष अखेर निवळला

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांचे नातू पार्थ पवार यांच्यात सुरु झालेला सुप्त संघर्ष अखेर निवळला असल्याची माहिती मिळत आहे. आज बारामती येथे पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत पवारांनी आपापसात सामंज्यसाने वादावर पडता टाकल्याचे समजत आहे.
 
याबाबत सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार या प्रकाराबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यात फोनवरून चर्चा झाली. त्यानंतर हा संपूर्ण वाद निवळल्याने शरद पवार हे पुण्याहून मुंबईला रवाना झाले. तर कुटुंबातील बैठक आवरून अजित पवार हे बारामतीहून पुण्यास रवाना झाले. दरम्यान, अजित पवार हे आता मुंबईला येण्याची शक्यता आहे.
 
होते. अजित पवार यांचे मोठे बंधू श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी पवार कुटुंबियांची बैठक झाली. यामध्ये शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर चर्चा करण्यात आली. त्यानंतर आजोबा-नातवामधील वाद संपुष्टात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पार्थ पवार शनिवारी त्यांचे काका श्रीनिवास यांच्या निवासस्थानी दुपारी साडेतीन वाजता आले होते. मात्र, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार येणार नसल्याची माहिती मिळाली होती. मात्र, काल रात्री साडेसात वाजता अचानक अजितदादा या ठिकाणी पोहचले. या वेळी पार्थ यांची समजूत घालण्यात आल्याचे सांगण्यात येत होते.