कोरोनाच्या काळामध्ये रुग्णालयांकडून अनेकदा रुग्णांना अव्वाच्या सव्वा बिल देण्यात येत असल्याची ओरड अनेक रुग्णालयातील रुग्णांनी केली होती. असाच प्रकार कल्याणमध्ये घडला असून, येथील एका रुग्णालयाने बिलाच्या वसुलीसाठी कोरोना रुग्णाच्या कुटुंबीयांची अडवणूक केल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकाने पीपीई किट घालून थेट रुग्णालाच उचलून घरी नेल्याचे पहायला मिळाले आहे.
रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे..कल्याणमधील श्रीदेवी रुग्णालयात कोरोनाचा संसर्ग झालेल्या ७० वर्षीय महिलेवर उपचार सुरू होते. रुग्णालयात दाखल करताना सदर रुग्णाच्या नातेवाईकांनी ८० हजार रुपयांचा भरणा केला होता. १४ दिवसांच्या उपचारानंतर महिलेचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्यानंतर डिस्चार्ज देण्यापूर्वी रुग्णालय प्रशासनाने अजून ८० हजार रुपयांती मागणी केली.विशेष म्हणजे या प्रकारामध्ये रुग्णालयाचा मनमानी कारभार स्पष्टपणे दिसून येत होता. या रुग्णालयाने पीपीई किटची फी पन्नास हजार रुपये लावली होती.
अखेर रुग्णालयाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे संतापलेल्या गायकवाड यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. तसेच मी रुग्णाला घेऊन जातोय, हिंमत असेल तर अडवून दाखवा असे सांगत स्वत: पीपीई किट अंगावर चढवून संबंधित वृद्धेला उचलून रुग्णालयातून घरी नेले., अशा रुग्णालयांवर कारवाई करण्याची मागणी गायकवाड यांनी यावेळी केली आहे.