IMPIMP
eknath shinde on vijay wadettiwar eknath shinde on vijay wadettiwar

“मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारितील परिवहन विभागातील एक नवा घोटाळा उघडकीस आला आहे. परराज्यातून नान हरकत प्रमाणपत्र ( एनओसी ) घेऊन अंधेरी आरटीओत १०० हून अधिक बस आणि अन्य वाहनांची बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. यावरून आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अधिवेशानात मुद्दा मांडला.

हेही वाचा…“जब चद्दर लगी फटने, खैरात लगी बटने”, महायुतीच्या अर्थसंकल्पावर कॉंग्रेसची जबरी टिका

प्रादेशिक परिवहन कार्यालये भ्रष्टाचाराची माहेरघरं झाली आहेत. या आधी आरटीओचा घोटाळा काही नवीन नाही. पण आता अंधेरी येथील आरटीओचा १२५ कोटींचा मोठा घोटाळा समोर आला आहे. या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आज वडेट्टीवार यांनी सभागृहात केली. तसेच अंधेरी आरटीने गेल्या वर्षी अनधिकृत वाहनांचा वापर करून बनावट ड्रायव्हिंग टेस्ट घेतल्या. त्या आधारे सुमारे ७६ हजार ड्रायव्हिंग लायसन्स जाहीर केल्याचेही वटेड्डीवार म्हणाले.

हेही वाचा..लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये 

अशी लायन्स जारी केल्यानेच पुणे येथे घडलेल्या पोर्शे कार अपघातासारखी प्रकरणे घडत आहेत. दोन दुचाकींवर ४१ हजार ९३ ड्रायव्हिंग लायसन्स जारी केले गेले. तर इतर ३५ हजार २६१ ड्रायव्हिंग लायसन्स दोन कारवर देण्यात आले. याप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. अशीही मागणी त्यांनी केली आहे.

तसेच माणसं मेली तरी आरटीओना काही फरक पडत नाही. आम्हाला फक्त पैसा द्या. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा नाही. आम्हाला फक्त पैसा महत्वाचा आहे. अशा पद्धतीने बेदरकारपणे या कार्यालयाचा कारभार सुरू आहे. असा हल्लाबोल देखील विजय वडेट्टीवार यांनी केला.

READ ALSO :

हेही वाचा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा 

हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं 

हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल 

हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

Leave a Reply