IMPIMP
ambadas danve vs uddhav thackeray ambadas danve vs uddhav thackeray

पाच दिवसासाठी दानवेंचं निलंबन, ठाकरेंचा हल्लाबोल, म्हणाले…हे सर्व ठरवूनच..”

मुंबई : सध्या राज्यातील पावसाळी अधिवेशन विविध मुद्यांवरून चांगलच गाजत आहे. यातच काल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर टिका आणि शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यावरून आता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

अंबादास दानवेंनी केलेल्या प्रकरावरून उद्धव ठाकरे यांनी पक्षप्रमुख म्हणून माफी मागितली आहे. यातच अंबादास दानवे यांच्यावर करण्यात आलेली कारवाई ही षडयंत्र रचून करण्यात आली आहे. असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षनेत्याला अशा प्रकारे निलंबित केलं गेलं असेल. हा सर्व अन्याय महाराष्ट्रातील जनता पाहत आहे. असेही ठाकरेंनी म्हटलं आहे.

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

उद्धव ठाकरे म्हणाले की, सभागृहात एखादा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर चर्चा करण्याची गरज असते. त्यावर विरोधी पक्षाची भूमिका मांडू देणं गरजेचं असतं. त्यानंतर निर्णय देत असतात. मात्र, एकतर्फी निर्णय देणं हे लोकशाहीला घातक आहे. खरं तर अंबादास दानवे यांनाही त्यांची बाजू मांडू देण्याची आवश्यकता होती. विरोधी पक्षाकडून कोणालाही बाजू मांडू देण्यात आली नाही. जणूकाही हे सर्व ठरवूनच षडयंत्र रचून विरोधी पक्षनेत्याला निलंबित केलं गेलं. असा आरोप देखील ठाकरेंनी केला आहे.

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत आमचा जो काही विजय झाला आहे. तो विजय झाकून टाकण्यासाठी, त्याच्या बातम्या मागे पडण्यासाठी ही निलंबनाची कारवाई करण्यात आलेली असावी. असा हल्लाबोल देखील ठाकरे यांनी केला आहे.

READ ALSO :

हेही वाचा…अश्विनी जगताप अन् शंकर जगताप यांच्यातला संघर्ष वाढला, भाजप अंतर्गत वाद चव्हाट्यावर 

हेही वाचा..“मैं समुंदर हूॅं लौटकर वापस जरूर आऊंगा”, माजी आमदार विलास लांडेंचं अखेर ठरलं ?

हेही वाचा..साहेब..! तुमचा शब्द खरा ठरवला.. विजयी किशोर दराडेंनी मुख्यमंत्र्यांना केला फोन

हेही वाचा…विधान परिषदेसाठी शिंदे गटाकडून दोन माजी खासदारांना संधी, तर ठाकरेंकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी

Leave a Reply