दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी कोरोनावर मात या विषाणूच्या विरोधात यशस्वी लढा दिला आहे. त्यांचा कोरोना अहवाल हा निगेटिव्ह आला आहे. याबाबत आमदार राहुल कुल यांनी स्वतः फेसबुकवर पोस्टद्वारे हि माहिती दिली आहे.
आमदार राहुल कूल यांची फेसबुक पोस्ट –
“कोरोनावर मात करून आज मी माझ्या राहू येथील निवास्थानी परतलो कुटुंबीयांनी अतिशय उत्साहाने माझे स्वागत केले. साधारणतः ३ आठवड्यानंतर कुटुंबियांची आज प्रत्यक्ष भेट झाली तो क्षण, आनंद शब्दात अवर्णीयच. आज पर्यंतच्या माझ्या सामाजिक जीवनात अगदी ३-४ दिवसही कामातून रजा घेतली, सहकारी, कार्यकर्ते यांच्या पासून दूर राहिलो असा प्रसंग क्वचितच घडला असेल, माझ्यासाठी हा विलगीकरणाचा काळ देखील खरे आव्हान होते.
शंभो महादेवाची कृपा व तुम्हा सर्वांच्या आशीर्वादांच्या बळावरच मी या दिव्यातून बाहेर पडलो असे मी मानतो. माझ्या प्रति आपली चिंता, स्नेह व प्रेमाचा मी मनापासून आदर करतो परंतु डॉक्टरांर्नी पुढील ३-४ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने मी आपल्याला नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष भेटू शकत नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मात्र दूरध्वनीद्वारे मी आपल्याशी नियमित संपर्कात असेल, धन्यवाद !”
दरम्यान, ७ जुलै रोजी राहुल कुल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. राहुल कुल यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याविषयी माहिती दिली होती. “डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार माझी कोरोना टेस्ट केली आणि ती पॉझिटिव्ह आली. सुदैवाने माझ्या संपर्कात असलेले माझे कुटुंबीय, कार्यालयातील सहकारी यांची टेस्ट निगेटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून योग्य उपचार सुरु आहेत” असे सांगत कुल यांनी समर्थकांना काळजी न करण्याचे आवाहन केले होते.