IMPIMP
Defeated by just 6 thousand votes, now Pankaja Munde will take a thank you tour Defeated by just 6 thousand votes, now Pankaja Munde will take a thank you tour

अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

बीड : अतिशय अटीतटीच्या लढाईत बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा अवघ्या सहा हजार मतांनी बजरंग सोनवणे यांनी पराभव केला. निकालाच्या दिवशी बजरंग सोनवणे यांनी सुरूवातीला पंकजा मुंडे यांच्यावर आघाडी घेतली. त्यानंतर पंकजा मुंडे यांना लीड मिळालं. ते २७ व्या फेरीपर्यंत तसंच राहिलं. परंतु त्यानंतर २८, २९, ३० आणि ३१ व्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. त्यानंतर आता संपुर्ण राज्यात पंकजा मुंडे दौरा करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार 

यावेळी पंकजा मुंडे म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत ज्यांनी ज्यांनी अथक प्रयत्न केले. अथक परिश्रम घेतले. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न ठेवता काम केले. त्या सर्वांचे भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे मनापासून आभार मानते. पुढील आठवड्यात म्हणजे १२ किंवा १५ तारखेपासून आपण पुर्ण जिल्हाभरात आभार दौरा करणार असेही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा..“कॉंग्रेसचे खासदार ९९ वरून १०० होणार ?” महाराष्ट्रातील एकमेव अपक्ष खासदार कॉंग्रेसमध्ये जाणार 

दरम्यान, जिल्ह्यात बीड, केज, माजलगाव, गेवराई, आष्टी आणि परळी असे सहा मतदारसंघ आहेत. केज मध्ये भाजपच्या नमिता मुंदडा आमदार आहेत. याठिकाणी मुंडे यांना फक्त १ लाख ९ हजार ३६० मते मिळाली. तर सोनवणे यांनी १ लाख २३ हजार १५८ एवढी मते घेतली. येथे सोनवणे यांना १३ हजारांचं लीड मिळालं. माजलगावमध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके हे आमदार आहेत. येथे पंकजा मुंडे यांना अवघी ९३५ मतांची लीड मिळाली. तर सोनवणे यांना १ लाख ४ हजार मते मिळाली.

संदीप क्षीरसागर यांच्या बीड मतदारसंघातून सोनवणे यांना ६१ हजारांची लीड मिळाली. तर धनंजय मुंडे यांच्या परळीतून ७४ हजारांची लीड मिळाली. आष्टीत महायुतीचे सुरेश धस आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे आमदार असूनही मुंडेंना फक्त ३२ हजारांची लीड मिळाली. शिवाय भीमराव धोंडे हे देखील याठिकाणी माजी आमदार आहेत. इतकी फौज असल्याने येथून ५० हजारांपेक्षा जास्त लीड मिळेल असा विश्वास भाजपला होता. परंतु तसे काही झाले नाही.

READ ALSO :

हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ 

हेही वाचा..NDA सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला ? शिंदेंच्या शिवसेनेलाही मिळणार कॅबिनेट पद 

हेही वाचा..केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी गडकरींपेक्षा चांगला पर्याय नाही 

हेही वाचा..पार्थ पवार, सुनेत्रा पवारांचा पराभव झाला, आता विधानसभेत अजित पवारांचाही पराभव होणार ? 

हेही वाचा..मोठी बातमी…! निकालाच्या दुसऱ्याच दिवशी खासदार लंकेंच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला