IMPIMP
Parth Pawar Parth Pawar

पिंपरी-चिंचवडमधील युवक राष्ट्रवादीचा निर्धार ; आम्ही अजितदादांसोबतच !

पिंपरी चिंचवड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये पिंपरी चिंचवड शहरात गळती सुरू झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पिंपरी शहराध्यक्ष अजित गव्हाणे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार  पक्षात प्रवेश करणार असतानाच, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनीही अजित पवारांची साथ सोडली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत  या दोघांनीही राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला आहे. यातच काही युवकांनी आता पार्थ पवारांची भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा…कॉंग्रेसची ताकद वाढली, ‘सहा’ आमदारांनी मध्यरात्री कॉंग्रेसमध्ये केला जाहीर प्रवेश 

पिंपरी चिंचवड शहाराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी मागील काही दिवसापुर्वी माजी नगरसेवकांसह शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर काही दिवसानंतर अजित पवार गटातील युवक उपाध्यक्ष विशाल वाकडकर आणि पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष विशाल काळभोर यांनी देखील अजित पवारांची साथ सोडली. त्यानंतर अजित पवार गटात अस्वस्थता पसरल्याचे दिसून आले.

हेही वाचा…“रोहित शर्मासह, सुर्यकुमार यादव, जैस्वाल, दुबेंचा सत्कार,” द्वेषाचे राजकारण करणाऱ्यांना आतातरी सुबुद्धी येवो

याच पार्श्वभूमीवर अजित पवार गटातील काही युवक पदाधिकाऱ्यांनी पार्थ पवार यांची भेट घेऊन पिंपरी चिंचवडमधील युवक राष्ट्रवादीने निर्धार केला आहे की, आम्ही अजितदादांसोबतच राहणार, असे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी पार्थ पवार यांच्यासोबत विधानसभा निवडणूक तयारीसंदर्भात चर्चा देखील चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे.

वाकडकर हे राष्ट्रवादी कॉंग्रेस युवकचे शहराध्यक्षही होते. काळभोर हे युवकच्या प्रदेश कार्यकारिणीवर कार्यरत होते. सध्या ते ते राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पिंपरी विधानसभेचे अध्यक्ष होते. या दोघांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला गळती लागण्यास सुरूवात झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“१० एकर शेतीतून तब्बल ११३ कोटींची वांगी पिकविणाऱ्या..,” भाजपचा सुप्रिया सुळेंना टोला 

हेही वाचा…आता बच्चू कडूंचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून झळकले बॅनर, यवतमाळमध्ये एकच चर्चा 

हेही वाचा…“घेणं न देणं फक्त क्रेडीट घेण्याची घाई..!” राज्य सरकारच्या सत्कार सोहळ्याच्या बॅनरवरून भारतीय क्रिकेट संघ गायब 

हेही वाचा..जरांगे पाटलांच्या सुरक्षितेचा मुद्दा विधानसभेत, मंत्री शंभुराज देसाई यांनी दिली महत्वाची माहिती 

हेही वाचा…“वर्ल्ड कप जसा मोदींनीच जिंकलाय, असा त्यांचा वावर”, विरोधकांची मोदींवर जहरी टिका 

Leave a Reply