राळेगणसिद्धी : केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, राधाकृष्ण विखेपाटील हे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले असून अण्णा हजारेंसोबत बैठकीस सुरुवात झाली आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात या मागणीसाठी अण्णा हजारे यांनी ३० जानेवारीपासून आपल्या गावी राळेगणसिद्धी येथे उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान अण्णा हजारे यांनी उपोषण करू नये अशी विनंती भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केली होती. मात्र, तरीही अण्णा हजारे हे आपल्या आंदोलनावर ठाम आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांना विनंती करून देखील अण्णा हजारे उपोषणवर ठाम असल्याने अण्णांची समजूत काढण्यासाठी आज स्वःत केंद्रीय कृषी राज्य मंत्री कैलास चौधरी, देवेंद्र फडणवीस हे राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले असून अण्णांसोबत बैठकीला सुरवात झाली आहे.
शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट हमीभाव देण्यात यावा तसेंच कृषी आयोगाला स्वायत्तता देण्यात यावी स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी सरकारनें मान्य कराव्या या प्रमुख मागण्यांसाठी अण्णा हजारे यांनी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
तर केंद्रीय राज्यमंत्री आज आमच्या मागण्यांचा ड्राफ्ट घेऊन राळेगणसिद्धीत बैठकीसाठी येत असून आमच्या मागण्यांनुसार तो ड्राफ्ट असल्यास आम्ही उपोषणबाबत विचार करू अन्यथा ३० जानेवारी पासून आमरण उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया अण्णा हजारेंनीं दिली आहे.
Read Also
मनसेच्या बैठकीवर शिवसेनेचा हल्लाबोल
“तर मुंबई मेट्रोने फडणवीस नागपूरचे विमान पकडू शकतील” थोरातांचा टोला