‘देवेंद्र फडणवीस यांनी सुशांत प्रकरणात केलेली सीबीआय चौकशीची मागणी आणि त्यानंतर त्यांची बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या प्रभारीपदी झालेली निवड, हा योगायोग आहे,’ अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली होती या टीकेवर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सुशांत केस आणि माझ्या बिहार नियुक्तीचा संबंध नाही. सुशांत प्रकरणी महाराष्ट्र पोलिसांवर राजकीय दबाव आहे. एरवी महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं आहे, पण सुशात केसमध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव आहे.’
“मला बिहार निवडणुकीत पक्षश्रेष्ठींकडून साहाय्य करण्यास सांगण्यात आलं आहे. मात्र, सुशांत प्रकरण आणि याचा काहीही संबंध नाही. महाराष्ट्र पोलिसांवर माझा विश्वास आहे. मात्र, पोलिसांनी कोणत्याही राजकीय दडपणाखाली काम करु नये”, असं फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हे पुण्यात मराठी पत्रकार संघ कोविड सेंटरच्या उद्घाटनाला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी राज्यातील कोरोनाची स्थिती, अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास आणि पार्थ पवार यांची नाराजी अशा विषयांवर भाष्य केलं