विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना सेंट जॉर्ज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. कोरोनाची लागण झाल्यानंतर गेल्या 12 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. पुढील दहा दिवस फडणवीस होम क्वारंटाईन असतील. ४ ऑक्टोबर रोजी त्यांची करोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर ते सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले होते. आज याच रुग्णालयातून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. करोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचं त्यांनी ट्विट करुन सांगितलं होतं
देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या सागर या शासकीय बंगल्यावर होम क्वारंटाइन असणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांना शुगरचा त्रास असल्याने त्यांची थोडी अधिक काळजी घ्यावी लागत होती. देवेंद्र फडवीस यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळीही ९३ पर्यंत खाली आली होती. त्यामुळे मागील आठवड्यात त्यांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन देण्यात आले.
“लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे, अशी माहिती ट्विट करत देवेंद्र फडणवीस यांनी 24 ऑक्टोबरला दिली होती.” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले होते.