IMPIMP
Devendra Fadnavis has said that the decision is not to push the responsibility Devendra Fadnavis has said that the decision is not to push the responsibility

“मावळत्या सरकारची जबाबदारी नाही तर उगवत्या सूर्याची जबाबदारी स्वीकारणारा निर्णय”

मुंबई :  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाची शनिवारी बैठक घेण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामांतराच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली आहे. यावरून आता दोन मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये नामंतराबाबत जे निर्णय घेतले हेच काही  दिवसांपुर्वी माविआ सरकारने घेतले होते. माविआ अल्पमतातील सरकारचे निर्णय असं आपण जरी म्हणाला तरी कोर्टाचा निर्णय येईपर्यंत तुम्हा दोघांचे सरकार तरी टिकेल का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारला केला आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

“माझी काय हकालपट्टी करणार, मीच सेनेतून बाहेर पडलो”; विजय शिवतारे

औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर‘ असे नामकरण, उस्मानाबाद शहराचे धाराशिव असे नामकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव ‘लोकनेते स्व. दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ‘ आणि एमएमआरडीएला ₹60,000 कोटींचे कर्ज घेण्यास मंजुरी आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. त्याचबरोबर मावळत्या सरकारचे जबाबदारी ढकलणारे नाही तर उगवत्या सूर्याचे जबाबदारी स्वीकारणारे निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतले आहेत. असं देखील त्यांनी म्हटलं आहे.

“दिल्लीने तुमचा बकरा केला, हिम्मत असेल तर लाथ मारून बाजुला व्हा” 

औरंगाबाद शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर असे करण्याचा निर्णय प्रत्येकासाठीच अभिमानाचा आहे. मात्र मागील काळात सरकारने शेतकरी हिताच्या घेतलेल्या निर्णयाला ज्या पद्धताने आपण थांबविले आहे ही पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना तरी आवडली असती का? असं ट्विट करत मिटकरी यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे. मागील सरकारच्या काळात सर्वात जास्त निर्णय नगर विकास खात्यासंदर्भात घेतले गेले. या निर्णयाबाबत आपण जनतेसमोर काहीच बोलत नाहीत.

आमदार महेश लांडगे- महापालिका आयुक्तांची मॅरेथॉन बैठक 

नगर विकास खात्याचे सर्व निर्णय आपण का रोखले कृपया हे लोकांना कळू दया. मागील सरकारला बारंबार अल्पमतात सरकार ठरवणारे आपण येणाऱ्या काळात सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आपले सरकार कायमस्वरूपी ताम्रपट घेऊन राहील का याचाही विचार करा. असंही मिटकरी यांनी ट्विट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read also