IMPIMP
Devendra Fadnavis scored a century, the only leader among the first-order leaders in the state Devendra Fadnavis scored a century, the only leader among the first-order leaders in the state

देवेंद्र फडणवीसांनी ठोकलं शतक, राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते

मुंबई : राज्यातील पाच टप्प्यापैकी तीन टप्प्यात आतापर्यंत मतदान पार पडलं आहे. तर चौथ्या टप्प्यासाठी उद्या अकरा लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यातच शेवटच्या टप्प्यातील मतदान हे २० मे रोजी होत असून यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईतील सहा तर ठाणे, कल्याण सह नाशकात मतदान होणार आहे. यासाठी आता महायुती आणि महाविकास आघाडीचे सर्वच नेते पश्चिम महाराष्ट्रात दाखल झाले आहेत. यातच भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सभांचा शतक पार पडलं असल्याची माहिती समोर येत आहे.

हेही वाचा…“गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी पुण्याचं चित्र बदललं”, पुण्यात मोहोळांसाठी फडणवीसांची सांगता सभा 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 100 सभांचा आकडा पूर्ण केला आहे. असं करणारे ते राज्यातील पहिल्या फळीतील नेत्यांपैकी एकमेव नेते आहेत. फडणवीसांनी महाराष्ट्रातच नव्हे तर केरळमध्ये ही एक सभा घेतली आहे. राज्यात 99 आणि केरळात 1अशा 100 सभा त्यांनी घेतल्या आहेत. भाजपने 400 पार जाण्याचा नारा दिला आहे. हे करताना घटक पक्षांच्या उमदेवारांची विजय निश्चिती महत्त्वाची आहे. यासाठी मोदी, शहांप्रमाणे फडणवीसांच्या सभेची ही मागणी वाढली होती. राज्यात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. फडणवीसांनी 130 हून अधिक सभा घेण्याचं नियोजन आखलं आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील तालुक्याच्या ठिकाणी ही या सभा होणार आहेत. आकडेवारी पाहिली तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सरासरी 3 सभा फडणवीस घेत आहेत.

हेही वाचा…“त्यावेळी घरदार अन् राजकारण सोडून कुठेतरी गेलो असतो”, मोहोळांनी सांगितली जूनी आठवण 

दरम्यान, राज्यात प्रथमच महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. एका बाजूला शरद पवार, उद्धव ठाकरे, आणि कॉंग्रेस आहे. तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात दोन्ही बाजूंच्या आतापर्यंत मोठ्या सभा पार पडल्या आहेत. दोन्ही बाजूंचे नेते एकाच वेळी व्यासपीठावर येतांना दिसत आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“निवडणूक लढविण्यासाठी मोदींनी गाई कापणाऱ्या कंपन्यांकडून साडेपाच हजार कोटी घेतले” 

हेही वाचा…“प्रचाराच्या तोफा थंडावल्या, अंतिम टप्प्यात महायुतीची मुसंडी” 

हेही वाचा..“ती धमक आमच्यात, नट हे काम करू शकत नाही”, अजित पवारांचा कोल्हेंना टोला 

हेही वाचा…राज ठाकरेंचा फतव्यानंतर पुण्यात “आमचं ठरलंय”चा ट्रेंड! मोहोळांच्या पथ्यावर पडणार 

हेही वाचा…“तुमची स्वप्न पुर्ण करण्याकरता घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून आढळरावांना विजयी करा”, नितीन गडकरी