भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी अखेर सदस्यपदाचा राजीनामा दिला असून आता ते राष्ट्रवादी प्रवेश करणार हे नक्की झाले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे शुक्रवारी दुपारी दोन वाजता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या गोट्यात मोठा भूकंप झाला आहे. भाजपकडून यावर टीका केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांचे भाजपमधील कट्टर प्रतिस्पर्धी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. मला एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनामा दिल्याचे कळल्यावरच मी यावर बोलेन. आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत, तेच याबद्द्ल सांगू शकतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
Read also
खडसे राष्ट्रवादी गेले असतील तर… CM ठाकरेंनी दिली पहिली प्रतिक्रिया https://t.co/YrwaParfOz#Eknathkhadase #CmThackarey #MahavikasAaghadi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 21, 2020