IMPIMP
dhairyashil-mohite-madha-loksabha-2024-result dhairyashil-mohite-madha-loksabha-2024-result

माढ्यात तुतारी सुसाट..! धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली मोठी आघाडी

पुणे : माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील यांना आतापर्यंत 39,453 पडली असुन त्यांनी भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळक यांच्या वर 7,486 मतांची आघाडी घेतली आहे. नाईक निंबाळकर यांना 31,967 मत पडली आहेत. तर कोल्हापूरमधून काँग्रेसचे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज चौथ्या फेरी अखेर 19415 मतांनी आघाडीवर आहेत.

वर्ध्यात भाजपचे रामदास तडस पिछाडीवर गेले आहेत. तर महाविकास आघाडीचे अमर काळे यांची पहिल्या फेरीपासुनची आघाडी कायम राखली आहे. अमर काळे यांना आतापर्यंत 61329 मत पडली आहेत तर रामदास तडस यांना 53095 मत पडली आहेत. यातच
8 हजार 234 मतांनी अमर काळे आघाडीवर आहेत.

दरम्यान, उत्तर मुंबई मतदारसंघातून भाजपचे पियुष गोयल आघाडीवर आहेत. पियुष गोयल यांना 53959 मत तर विरोधात असलेल्या कॉंग्रेसच्या भूषण पाटलांना 26102 पडली आहेत. सध्या गोयल यांनी 27867 मतांची आघाडी घेतली आहे.