मुंबई : गेल्या काही दिवसांपासून तीव्र पोटदुखीचा त्रास होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी ट्विट करत दिली.
तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) November 10, 2020
ट्विट करत त्यांनी माहिती दिली की, तीव्र पोटदुखीमुळे मागील काही दिवसांपासून मी त्रस्त आहे. त्यामुळे उपचारासाठी आज मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झालो आहे. प्रकृती स्थिर असून उपचार घेऊन मी लवकरच पुन्हा आपल्या सेवेत दाखल होईल.
दरम्यान, धनंजय मुंडे यांना जून महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती.