मुंबई : 105 आमदार असणाऱ्या पक्षाचे विरोधी पक्षनेते आहेत,. हे लोकशाहीचे फार मोठे चित्र शरद पवार यांनी देशाला दाखवले असल्याचे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी ज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला लगावला आहे.
महाराष्ट्रात पहिल्यांदाच पवारसाहेंबाच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन प्रयोग झाला आहे. नवीन लोकशाहीची ओळख पवारसाहेबांनी देशाला दिली. 64 आमदार असणाऱ्या पक्षाचे मुख्यमंत्री, 54 आमदार असणाऱ्या पक्षाचे उपमुख्यमंत्री, तर 44 आमदार असणाऱ्या पक्षाचे मंत्री झाले. तर 105 आमदार असणाऱ्या पक्षाचे विरोधी पक्षनेते झाले. हे लोकशाहीचे फार मोठे चित्र शरद पवार यांनी देशाला दाखवले असल्याचे म्हणत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा चिमटा काढला. महाविकास आघाडी सरकारला 1 वर्ष पुर्ण झाल्याचे निमित्ताने धनंजय मुंडे बोलत होते.
धनंजय मुंडे म्हणाले की, सरकारला एक वर्ष पुर्ण झाली असून, याकाळात अनेक संकटे आली. यात सर्वात मोठे संकट कोरोना व्हायरसचे होते. या संकटाला तोंड देत महाराष्ट्राच्या जनतेचे आरोग्य सांभाळत, विकासाची सांगड घालत सरकारने वर्ष पुर्ण केले.
या वर्षात सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. यात शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, नियमित कर्जदारांना 50 हजार रुपये देण्याचा निर्णय असे अनेक निर्णय सरकारने घेतले. काही निर्णय, काही कामे आम्हाला सर्वदूर महाराष्ट्रात सुरू करायची होती. पण केंद्राने जीएसटीचे पुर्ण पैसे दिले नाहीत. या आर्थिक निर्बंधांमुळे ज्या गतीने महाराष्ट्राचा विकास गेल्या एक वर्षाच्या काळात करायचा होता, ती गती मात्र मंदावली,’ असेही ते म्हणाले.