पुणे : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न चर्चेत असताना, धनगर आरक्षणाच्या मागणीने देखील जोर पकडला आहे. यातच आता ग्रेस, भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला आहे असल्याचे भाजप नेते राम शिंदे यांनी म्हटले आहे.
विरोधात असलं प्रत्येकजण धनगर आरक्षण देऊ म्हणतो. पण सत्तेत आल्यानंतर त्यावर कुणी बोलायला तयार होत नाही. परिणामी आरक्षणाचा प्रश्न जिथे आहे तिथेच राहतो. काँग्रेस, भाजपसह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा खेळ केला, असे म्हणत राम शिंदे यांनी भाजपलाच घरचा आहेर दिला.
भाजप, काँग्रेस आणि बाकीच्या सगळ्या पक्षांनी धनगर आरक्षणाबाबत सोयीची भूमिका घेतली आहे. आरक्षणाचा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे देखील ते म्हणाले.
दरम्यान, धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर राम शिंदे आणि उदयनराजे भोसले यांच्यात चर्चा होणार होती. पण काही कारणास्तव उदयनराजे बैठकीला येऊ शकले नाहीत.