मुंबई : मराठा आरक्षणावरून राज्यात मराठा समाजाने आंदोलनाची हाक दिलीआहे. आता धनगर आरक्षणासाठी धनगर समाज आक्रमक झाल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे. यामुळे ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
धनगर समाजाच्या आंदोलनाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. परभणीत हे आंदोलन केले जाईल. त्यानंतर पुढे प्रत्येक जिल्ह्यात, तालुका पातळीवर आंदोलन करण्यात येईल. महाराष्ट्रातून धनगर समाजाचे नेते आंदोलनात सहभागी होणार आहेत. धनगर समाजाला महाराष्ट्र सरकारने वेळ द्यावा. यातून मार्ग काढावा. अन्यथा आंदोलन सुरूच राहणार, अशी रोखठोक भूमिका प्रकाश शेंडगे यांनी घेतली आहे.
दरम्यान यापूर्वी धनगर समाजाचा अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला नाही तर मोठं जन आंदोलन उभारु, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी अद्याप भेटायची वेळ दिलेली नाही. त्यांना भेटूनच धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत पुढील वाटचाल ठरवू, असेही प्रकाश शेंडगे यांनी सांगितले होते.
Read Also