मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाची पद्धत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. त्यात त्यांचे वायरल झालेले फोन वरील कामाचे व्हिडिओ आहेतच. अशातच आता एका चिमुरडीसोबतचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिलखुलास गप्पा मारतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र तिच्या एका प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही निरुत्तर झाले असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी
अन्नदा नावाची ही लहान मुलगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला गेली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांशी बोलताना म्हणाली की, माझ्या मोठ्या बाबांनी दाखवलं होत की तुम्ही कोरोनामध्ये लोकांची खुप मदत केली, पूर आला तेव्हा पाण्यात जाऊन मदत केली. मी पण अशी मदत केली तर मलाही मोठं झाल्यावर मुख्यमंत्री होता येईल का? या तिच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हसुन उत्तर दिलं की, हो नक्की होता येईल. आपण त्यासाठी खास रिझर्वेशन करू. असं देखील एकनाथ शिंदेंनी म्हटलं.
“काय तो पाऊस, काय तो पुर, काय ते खड्डे, सगळं ओके आहे;”भुजबळांची मुख्यमंत्र्यांवर टोलेबाजी
ती पुढे म्हणाली की, पुर्वी मला फक्त मोदीजी आवडायचे, पण धर्मवीर बघितल्यापासुन तुम्हाही आवडू लागले आहात. तसचं आता तुम्ही रुद्रांशला (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नातु) वेळ कसा दयाल? असाही प्रश्न तिने विचारला. याचबरोबर या छोट्या चिमुरडीने मुख्यमंत्र्यांकडे एक हट्टही केला, ज्यामुळे एकनाथ शिंदे निरूत्तर झाल्याचे पाहायला मिळाले. अन्नदा पुढे म्हणाली की, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं, येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाल? तिच्या या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना काय उत्तर द्यावं असा प्रश्न पडला असावा. शेवटी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायचं ना, जाऊया, असं म्हणत त्या चिमुकलीची मुख्यमंत्र्यांनी समजुत काढली.
“पैशाची खेळी करता येत नसल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीने तो निर्णय रद्द ठरविला होता”
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा देखील ते त्यांनी नातूला कडेवर उचलून घेतलं होतं. तसेच सभागृहात केलेल्या भाषणात देखील त्यांनी स्वत:च्या मुलाला वेळ देता आलं नसल्याचं म्हटलं होतं. त्यावेळी ते खुपच भावुक झाले होते.
Read also
- “अमोल मिटकरी सध्या राहतात भाजप नेत्याच्या घरी”; महिन्याला मोजतात 27 हजार
- राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी- काॅंग्रेसचे मत फुटतील; भाजप आमदाराचा दावा
- आघाडीच्या 941 कामांना ब्रेक; अजित पवारांसह राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
- “दिल्लीचा राग अजून गेला नाही”? फडणवीसांच्या वाढदिवशी नो, जाहिरात, नो होर्डिंग
- “मंत्रिमंडळाच्या निर्णयावर राऊतांचं बोट;” संविधानाचा दाखल देत केला सवाल