IMPIMP
ajit pawar group ajit pawar group

भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात

पुणे : स्थानिक कार्यकर्त्यांचं मत लक्षात घेऊन निर्णय घेणार असाल तर पहिल्यांदा महायुतीतून अजित पवार यांना बाहेर काढा. कारण त्यांनी इथल्या स्थानिक नेत्यांवर अन्याय केला आहे. त्यांचा हस्तक्षेप नसता तर या भागातून तीन मंत्री झाले असते. किमान अनेकांना महामंडळे मिळाली असती. अशी तीव्र स्वरूपाची नाराजी आणि खदखद नुकतीच झालेल्या शिरूर लोकसभा पराभव चिंतन बैठकीत भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. त्यावरून राज्यात याची एकच चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..टायगर अभी जिंदा है..! चंद्रपुर जिल्ह्यात बडे नेते लागले विधानसभेच्या तयारीला

त्यावर आता अजित पवारांबद्दल बोलणे बरेच जण टाळत होते. कारण त्यांचा वेगळा दरारा होता, तो दरारा भाजपसोबत गेल्यावर कमी झाला आहे. अशी खोचक टिप्पणी रोहित पवारांनी केली आहे. तसेच  भाजपासोबत अजित पवार राहिले  तर त्यांना फक्त २० जागा लढाव्या लागतील. अजितदादांचे आमदार खुळे नाहीत, त्यांना माहित आहे की, भाजपा कोणत्या पातळीवर जाऊ शकते.  येत्या काळात अजित पवारांची अजून राजकीय ताकद कमी करताना भाजपा दिसेल. असेही त्यांनी म्हटलंय.

हेही वाचा..हडपसरमध्ये शरद पवारांचा उमेदवार फिक्स, मात्र कॉंग्रेस अन् ठाकरे गटाने दावा ठोकल्यानंतर वाद चिघळणार 

पुढे बोलतांना रोहित पवार म्हणाले की, जयंत पाटील हुशार नेते आहेत. त्यामुळे ही फक्त सुरूवात आहे. पुढे जाऊन बघा काय होते. येणारे खुप आहेत. घ्यायचे किती हा प्रश्न आहे. शरद पवार याबाबत निर्णय घेतील. असे सांगताना भाजपाचे नेते वागण्यामध्ये अजित पवारांसोबत दुजाभाव करत आहेत. भाजपा नेते करतच होते. आता कार्यकर्ते अजित पवारांच्या विरोधात बोलायला लागले हे आश्चर्य आहे.

जिथे भाजपचा राजकीय विचार संपतो. तिथे शरद पवारांचा विचार सुरू होतो. भाजपला आणि महायुतीच्या अनेक नेत्यांना कळणार नाही की काय घडले आहे. याचा एक ट्रेलर लोकसभेमध्ये आपण सर्वांनी पाहिला आहे. विधानसभेमध्ये महायुतीचे सर्व नेते तोंडाकडे बघत राहतील. अशी परिस्थिती येणार आहे. १८ ते १९ आमदार शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत. कुणाला घ्यायचे ? नाही घ्यायचे ? हे ते दोघेच ठरवतील. असंही त्यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

हेही वाचा..“तीनवेळा प्रयत्न केला, आता माघार नाही”? रमेश कोंडे भाजपच्या आमदाराची खोची करणार ? 

हेही वाचा..“अजित पवारांनी अन्याय केला का नाही ? “भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं मोठं विधान

हेही वाचा..“चंद्रकांत पाटलांनी आम्हाला चॉकलेट दिले असले तरी जे हलाहल पचवून शिवसेना उभी” 

हेही वाचा…लिप्टमध्ये ठाकरे अन् फडणवीसांची काय चर्चा झाली ? प्रत्यक्षदर्शी भुजबळांनी सांगितली खरी हकिकत 

Leave a Reply