IMPIMP
eknath shinde vs vijay wadettiwar eknath shinde vs vijay wadettiwar

“गरिब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून त्यावर ठिगळं लावून काही होणार नाही”

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक योजनांची घोषणा केली आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांनी जाहिर केलेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन मतांची पेरणी केली आहे. याचदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर केली आहे. यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांवर तुटून पडत आहेत. अशातच राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी  आता महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हेही वाचा..“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका

वडेट्टीवार म्हणाले की, महिलांसाठी योजना जाहीर करून महायुती सरकारने प्रायश्चित घेतले आहे. महायुतीमधील एका नेत्याने बहिण-भावाच्या नात्यावर केलेले घाणेरडे वक्तव्य महायुतीला चांगलेच महागात पडले होते. राज्यात महिलावर अन्याय अत्याचार वाढले. गरीब महिलांना या सरकारने फाटक्या साड्या वाटल्या. या सगळ्याचे प्रायश्चित म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणली आहे. गरीब माता भगिणींना फाटक्या साड्या वाटून पुन्हा त्यावर योजनांची ठिगळं लावून काही उपयोग होणार नाही. राज्यातील महिला या सरकारला चांगलाच धडा शिकविणार आहेत.

हेही वाचा…“अर्थसंकल्प म्हणजे आश्वासनांची अतिवृष्टी अन थापांचा महापुर,” ठाकरेंची खरमरीत टिका 

दरम्यान,  राज्यातील शेतकरी, महामंडळे, सारथी, बार्टी, महाज्योतीसारख्या संस्था यांच्यासाठी योजना जाहीर केल्या. परंतु हे लबाडाचं आमंत्रण आहे. ते जेवल्यावरच खरं मानावं लागेल. त्यामुळे या फसव्या तरतूदींना भूलन जाऊ नये. कारण अर्थसंकल्प सादर करायचा आणि त्याची अंमलबजावणी करताना जुमलेबाजी करायची हा या सरकारचा शिरस्ता आहे. कालच आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यावर मान शरमेनं खाली जाईल, अशी परिस्थिती दिसून आली. अशी टिका देखील त्यांनी केली.

तर महाराष्ट्राला गुजरातने मागे टाकल्याचा पुरावा म्हणजे आर्थिक पाहणी अहवाल होता. दिल्लीश्वरांनी महायुतीला सत्ता मिळवून दिल्यावर त्यांनी महाराष्ट्राला गुजरातच्या मागे ठेवायचं काम महायुतीला दिल होतं. हे काम या सरकारने चोख बजावलं आहे. सुरतमधल्या पाहुणचारावेळी दिलेल्या कानमंत्रानुसार महाराष्ट्राला या महायुतीने खड्डयात घातले आहे. गुजरातच्या खाल्या मिठाला जागणारे हे सरकार महाराष्ट्राचं भलं करू शकत नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा..विधान परिषदेसाठी भाजपच्या १० नेत्यांची यादी व्हायरल, बावनकुळेंनी केला मोठा खुलासा 

हेही वाचा..”मुख्यमंत्र्यांच्या खात्यात भ्रष्टाचार म्हणजे दिव्याखाली अंधार”, वडेट्टीवारांनी उघडकीस आणला परत एक घोटाळा

हेही वाचा..मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घडवणार तीर्थदर्शन, शिंदेंकडून ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची’ घोषणा 

हेही वाचा..महाविकास आघाडीचा नवरदेव कोण ? कॉंग्रेस मात्र वऱ्हाडीच्या भूमिकेत, भाजपने डिवचलं 

हेही वाचा…कोल्हापुरात अजित पवार गटाला खिंडार, बडा नेता शरद पवार गटात होणार दाखल 

Leave a Reply