मुंबई : कोरोना व्हायरसच्या लढ्यात डॉक्टर सर्वात पुढे उभे राहून मदत करत आहेत. या महामारीत कोरोनो योद्धांचा लोकांसाठी काम करताना संसर्ग झाल्यामुळे मृत्यू देखील होत आहे. कोरोनाशी लढताना मृत्यू झाल्यानंतरही सरकारने विमा कवच नाकारल्याचा दावा डॉक्टरांनी केला असून, याबाबत त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेत मदतीची मागणी केली आहे.
कृष्णकुंजवर राज ठाकरे यांची भेट घेत डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी सांगितले की, कोरोना काळात सरकारने डॉक्टरांना सक्तीने क्लिनिक उघडण्यास भाग पाडले, मात्र मृत्यू झालेल्या डॉक्टरांचा विमा मात्र नाकारला जात आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉक्टर म्हणाले की, जून महिन्यात आमच्या एका सहकाऱ्याचा कोव्हिडमुळे मृत्यू झालाआम्ही अर्ज केला असता तुमचा डॉक्टर प्रायव्हेड प्रॅक्टिशनर असल्याने विमा देता येणार नाही असे सांगण्यात आले.