पुणे : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्यात आरक्षणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यावं अशी मागणी काही मराठा संघटनांनी केली आहे. त्याला ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. यातच राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काही दिवसांपूर्वी ओबीसी समाजानं मन मोठं करावं, त्यामुळे मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल असं विधान केले होते. मात्र आता याबाबत ओबीसी समाजातून जोरदार प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.भाजपचे माजी आमदार आणि ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर यांनी खासदार कोल्हेंच्या या विधानाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कोणत्याच ओबीसी नेत्याचा विरोध नाही, एवढच काय पण मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे मोर्चे राज्यभर निघाले त्यामध्ये राज्यातील सर्व घटकांचा समावेश होता. मात्र ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या असे म्हणून अमोल कोल्हे यांना मराठा समाजाचे नुकसान करायचे आहे का ? असा सवाल यानिमित्ताने योगेश टिळेकर यांनी उपस्थित केला आहे.
ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला आरक्षण दिले तर मराठा समाजाला फक्त ३ % आरक्षण मिळेल त्यामुळे ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला आणून अमोल कोल्हे मराठा समाजचे नुकसान करत आहेत म्हणून कोल्हेंच्या अशा वक्तव्याचा आम्ही धिक्कार करतो असे देखील टिळेकर यांनी यावेळी सांगितले.
मराठा समाजाला फडणवीस सरकारने दिलेले १३ % आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले पाहिजे अशी मागणी देखील यावेळी योगेश टिळेकर यांनी केली. ओबीसींच्या आरक्षणात मराठा समाजाला आणून मराठा समाजाचे कोल्हेनी नुकसान करू नहे तसेच मराठा तरुणांची माथी भडकवू नका असे आवाहन देखील योगेश टिळेकर यांनी यावेळी केले.
काय म्हणाले होते नेमकं अमोल कोल्हे ?
मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही योग्य आहे ते करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. पण २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. तरीही जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.
Read Also
“किसान विरोधी शरद पवार”,प्रवीण दरेकर यांचा हल्लाबोलhttps://t.co/nNPNgT4YZx#SharadPawar #PravinDarekar #KisanBill2020 #KisanBachaoYuvaBachao #KisanVirodhiSharadPawar #KisanWithPMModi
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020