मुंबई : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शिवसेनेचा दसरा मिळावा दरवर्षी मोठ्या उत्सहात शिवाजीपार्क मैदानावर साजरा केला जातो. मात्र यंदाच्या वर्षी या मेळाव्यावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याला वेगळंच महत्त्व आहे. पण अद्याप पक्षामध्ये दसरा मेळाव्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, कोरोनाची परिस्थिती पाहता दसरा मेळावा होण्याची शक्यता कमी आहे. परंतु त्याबाबत कालांतराने निर्णय होईल. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करु शकतात असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हंटले आहे.
शिवसेना-शिवाजी पार्क आणि दसरा मेळावा यांचे वर्षानुवर्ष समीकरण बनलं आहे. दसऱ्याच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाखोंच्या संख्येने शिवाजी पार्कवर गर्दी जमत असे. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवाजी पार्क येथे झाला होता. शिवाजी पार्क म्हणजे शिवसेनेसाठी शिवतीर्थ..याठिकाणी बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणानं आणि शिवसैनिकांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दसऱ्याच्या दिवशी दणाणून जायचा.
Read Also
आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसबाबत शरद पवार म्हणतात…https://t.co/MbNEAkFJeB#SharadPawar #Incometaxnotice #NCP #KisanBill2020
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 22, 2020