केंद्र सरकारनं कोविडच्या लॉकडाऊनसंदर्भात दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना राज्याराज्यांनी तेथील परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यानुसार आता केंद्र सरकारनं राज्यांतर्गत वाहतुकीवरील सर्व निर्बंध हटवले आहेत. मात्र महाराष्ट्रात खासगी वाहनांसाठी ई-पास बंधनकारक असणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून ई-पासची अट हटवण्याची मागणी जोर धरत होती. मात्र ई-पास कायम राहणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. गृहमंत्री अनिल देशमुखांनी याबद्दलची माहिती दिली आहे.
As per the discussions held with Hon'ble CM, the existing #MissionBeginAgain guidelines will be in effect in Maharashtra, till any further announcement. https://t.co/yMc7GSmORl
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) August 23, 2020
काही ठिकाणी ई-पासची सक्ती राहू शकते. राज्य शासनानं आदेश काढूनही त्यांची अंमलबजावणी न करता वेगळे निर्णय लॉकडाऊनच्या काळात काही भागात यापूर्वीही घेण्यात आले आहेत.
राज्य शासनानं काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना (महापालिका, नगरपालिका आदी) तेथील परिस्थिती बघून निर्णय घेण्याचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे राज्य शासनानं ई-पास रद्द करण्याचा निर्णय घेतला तरी ई-पास राज्यात सगळीकडेच रद्द होतील असं नाही.
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढे देखील लागू राहतील असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.