लेबनानची राजधानी बैरुत येथे मागील आठवड्यात हजारो टन अमोनियम नायट्रेटच्या स्फोटात जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला होता, तर हजारो जण जखमी झाले होते. संपुर्ण शहरच या भयंकर स्फोटामुळे विराण झाले होते. यानंतर तेथील सरकारच्या विरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरत संताप व्यक्त केला. बैरुतच्या स्फोटानंतर आता लेबनानच्या पंतप्रधानांसह संपुर्ण मंत्रिंडळानेच राजीनामा दिला आहे.
Lebanon government resigns amid outrage over Beirut blast: Reuters
— ANI (@ANI) August 10, 2020
यांनी दिली. बैरूतमध्ये झालेल्या स्फोटाच्या निषेधार्थ लेबनॉनमध्ये सरकारविरोधात मोठया प्रमाणावर निदर्शने, आंदोलने सुरु आहेत. पंतप्रधान हसन दियाब यांनी राष्ट्राध्यक्षांकडे राजीनामा सोपवला. दियाब यांच्या आधी मंत्रिमंडळातल्या त्यांच्या काही सहकाऱ्यांनीदेखील राजीनामे दिले होते.
बैरुतमध्ये बंदरातील गोदामात साठवण्यात आलेल्या अमोनियम नायट्रेटच्या साठयामुळे हा स्फोट झाला. अनेकजण अजुनही बेपत्ता आहेत. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत हसन दियाब यांचे सरकार काळजीवाहू सरकार म्हणून कामकाज पाहिलं.