2019 मधील लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधी यांनी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून नियुक्त करण्यात आले होते. वर्ष होऊन गेले तरीही काँग्रेसने अध्यक्षाची नियुक्ती केलेली नाही, त्यामुळे काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठले जावू शकते.
कायमस्वरूपी अध्यक्ष अद्याप का नियुक्त करण्यात आलेला नाही, याचे उत्तर न दिल्यास काँग्रेसचे निवडणूक चिन्ह गोठविले जाऊ शकते. अपात्र किंवा निलंबन कारवाईला काँग्रेसला सामोरे जावे जाऊ शकते.
कोरोना महामारीमुळे नवीन अध्यक्षांची निवड करण्याची प्रक्रिया स्थगित करण्यात आल्याचे असे स्पष्ट करीत काँग्रेसने स्थिती सर्वसामान्य होताच निवडणूक आयोगाच्या नियमाचे पालन करण्याचे आश्वासनही दिले आहे.
दरम्यान, निवडणूक आयोग पक्षाच्या अंतर्गत मुद्यात हस्तक्षेप करू शकत नाही. मात्र पक्षांनी नियमांचे पालन न केल्यास निवडणूक आयोग संबंधित पक्षाविरुद्ध कारवाई करू शकते. काँग्रेस संघटनेत पद रिक्त झाल्यानंतर ठराविक अवधीत नवीन अध्यक्षांची निवड करण्यासंबंधी विशेष तरतूद आहे का? याबाबत निवडणूक आयोग चौकशी करू शकते. तसेच या ठराविक मुदतीच्या आत पक्षांतर्गत निवडणूक घेण्याचेही आदेश आयोग देऊ शकते.